डीडी स्पोर्ट्सवर LIVE सामना
टीम इंडियाचे चाहते डीडी स्पोर्ट्सवर हा सामना मोफत पाहू शकतात. या चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण देखील केले जाईल. येथे हे लक्षात घ्यावे लागेल की डीडी फ्री डिश फक्त तेच सामने प्रसारित करेल ज्यामध्ये भारतीय संघ खेळत आहे. त्यामुळे तुम्ही आता घरबसल्या टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर सामना लाईव्ह पाहू शकता.
advertisement
जिओवर सबस्क्रिप्शन मोफत
जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या कंपन्यांनी असे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत, ज्यात सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. केवळ 95 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
भारतीय संघ - अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
पाकिस्तान संघ - सॅम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमन, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हारिस राऊफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, सलमान मिर्झा.