सुरूवातीच्या 2 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाला वैभव सूर्यवंशीकडून अपेक्षा होत्या, पण 10 बॉलमध्ये 26 रन करून वैभव आऊट झाला. अली रझाच्या बॉलिंगवर हमझा झहूरने वैभवचा कॅच पकडला. वैभवची विकेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा बॉलर अली रझाने जोरदार सेलिब्रेशन केलं, पण हे सेलिब्रेशन पाहून वैभव चांगलाच संतापला.
पाकिस्तानी खेळाडूंनी केलेलं सेलिब्रेशन वैभव सूर्यवंशीला आवडलं नाही, यानंतर त्याने पाकिस्तानच्या टीमला पाहून इशारा केला, जो आता वादात सापडला आहे. तुम्ही माझ्या पायाची धूळ असल्याचा इशारा वैभवने पाकिस्तानी खेळाडूंना पाहून केला. वैभवच्या या कृतीवरून काही चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कामगिरी शून्य आणि अॅटिट्यूड 100 अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी वैभवच्या या व्हिडिओकडे पाहून केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीने त्याच्या इनिंगमध्ये एक फोर आणि 3 सिक्स मारल्या, पण त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. वैभव सूर्यवंशीच्या आधी टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचाही पाकिस्तानी खेळाडूंसोबत पंगा झाला. वैभवच्या आधी अली रझाने आयुष म्हात्रेचीही विकेट घेतली, तेव्हाही आयुष म्हात्रे आणि अली राझा यांच्यात राडा झाला. आयुष म्हात्रेने अली रझाला पाहून अपशब्द वापरले, याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
