सूर्यकुमार घेणार विराटचा बदला!
दुबईच्या या मैदानावर भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त तीन टी-ट्वेंटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने दोन जिंकले आहेत. या मैदानावर दोन्ही संघांमधील पहिला टी-ट्वेंटी सामना 24 ऑक्टोबर 2021 रोजी खेळला गेला होता. हा टी-ट्वेंटी विश्वचषक सामना होता ज्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला होता. टीम इंडियाची यावेळी मोठी नाचक्की झाली होती.
advertisement
दुबईत पाकिस्तानचा वरचष्मा
यानंतर 28 ऑगस्ट 2022 रोजी, या दोन्ही संघांनी पुन्हा एकदा आशिया कपमध्ये टी-ट्वेंटी सामना खेळला, ज्यामध्ये भारताने पाच विकेट्सने विजय मिळवला. त्याच आशिया कपमध्ये, 4 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले, ज्यामध्ये पाकिस्तानने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला.
खेळपट्टीवर कोण कमाल दाखवणार?
दरम्यान, दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी योग्य मानली जाते पण यावेळी परिस्थिती बदलली आहे आणि येथे वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळाली आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना दुर्लक्ष करता येणार नाही. काहीही झाले तरी, गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाज येथे खेळपट्टीवर वर्चस्व गाजवतील. याचा अर्थ असा की धावांचा पाऊस पडला तर आश्चर्य वाटणार नाही. भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही त्यांचा पहिला सामना जिंकला असताना स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
दरम्यान, जर दोन्ही टीम्सने ग्रुप स्टेजमध्ये चांगले खेळले, तर ते सुपर फोरमध्ये पुन्हा 21 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात. आणि जर दोन्ही टीम्सनी अंतिम मॅचसाठी क्वालिफाय केले, तर 28 सप्टेंबरला फायनलमध्ये पुन्हा एकदा त्यांचा सामना होऊ शकतो.