Wild Flowers: डोंगरावर निसर्गाने विणला रंगीत गालिचा! करपेवाडी ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण, बघा VIDEO
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Wild Flowers: करपेवाडीचा डोंगर स्थानिकांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही आकर्षण ठरत आहे. अनेक शाळकरी मुलं आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देत आहेत.
कोल्हापूर: यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने निसर्ग बहरून गेला आहे. बहुतांशी डोंगरांनी हिरवळीचा शालू पांघरला असून काही ठिकाणी रंगीबेरंगी फुलं देखील फुलली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील करपेवाडी या छोट्याशा गावावरचा डोंगर देखील सध्या रंगीबेरंगी फुलांनी सजला आहे. गावकरी याला प्रेमाने 'मखमली पठार' असं म्हणतात. पावसाळ्याच्या अखेरीस या पठारावर वेगवेगळ्या जातींच्या रानफुलांचा बहर उमलतो.
साताऱ्यातील जागतिक वारसा स्थळ असलेलं कास पठार जसं विविध फुलांनी आकर्षक दिसते अगदी तसाच देखावा करपेवाडीच्या डोंगरावरही अनुभवायला मिळतो. इथे पावसाळ्यात जवळपास 15 हून अधिक प्रकारची रानफुलं एकत्र फुलून निसर्गाचा रंगीत गालिचा विणतात. या ठिकाणी गुलाबी-जांभळट गोलसर गोलवेल (माळरान गुलाब), पांढरी-करडी कुडकी (कापूस फुलं), जांभळट-निळसर शंखपुष्पी, फिकट जांभळी घंटीसारखी कावळ्याची भाकरी, पांढरी लहान दुधी, झुकलेली भारंगी (भूमीचक्र), जांभळसर कांदळ/कंदली (कारवी), लालसर-पिवळसर अग्निशिखा (गौरीची फुलं) अशी असंख्य रानफुलं फुलतात. या फुलांनी संपूर्ण डोंगर मखमली कापडासारखा भासतो.
advertisement
विशेष म्हणजे Strobilanthes callosa म्हणजेच कारवी या झाडाचा फुलोरा काही ठिकाणी सात ते आठ वर्षांतून एकदाच बहरतो. तर काही उपप्रजाती दरवर्षी फुलतात. त्यामुळे या पठाराचा गालिचा प्रत्येक वर्षी वेगळ्या रंगात दिसतो. दरवर्षी या दिवसांत शाळकरी मुलं आणि आजूबाजूच्या गावांतील तरुणाई इथे भेट द्यायला येते. रंगीबेरंगी रानफुलांच्या नजाऱ्यामुळे 'मखमली पठार' हा परिसर स्थानिकांसाठीच नाही तर पर्यटकांसाठीही खास ठिकाण बनला आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 13, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wild Flowers: डोंगरावर निसर्गाने विणला रंगीत गालिचा! करपेवाडी ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण, बघा VIDEO