विराट कोहलीसोबत यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे, जिथे एक चाहता सुरक्षा भंग करून त्याच्यापर्यंत पोहोचला. जरी त्यांचा हेतू कोहलीला इजा करण्याचा नव्हता, तरीही तो सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतो. आता प्रश्न असा उद्भवतो की क्रिकेट सामन्यात सुरक्षा भंग केल्यास कोणती शिक्षा दिली जाऊ शकते?
कोणती शिक्षा दिली जाते?
आयसीसी आणि बीसीसीआयकडे अशा प्रकरणांमध्ये स्पष्ट नियम नाहीत, परंतु बहुतेक कारवाई कठोर असतात. अनेकदा सुरक्षा पथके अशाप्रकारे मैदानात जाणाऱ्या चाहत्याला समजावून सोडून देतात, पण काहीवेळा कठोर कारवाई केली जाते. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपवेळी ऑस्ट्रेलियातील एका भारतीय चाहत्याला तब्बल 6.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
advertisement
सुरक्षा रक्षक पकडल्या गेलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीनही करू शकतात. रांचीमधील या चाहत्यासोबतही असंच काहीसं घडलं आहे.
कोहलीच्या पायांना स्पर्श करणारा चाहता कुठे आहे?
रांचीमध्ये कोहलीकडे जाणाऱ्या चाहत्याचे नाव सौविक असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या वृत्तात त्याच्या वडिलांनी सांगितले आहे की सौविकने तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे वाचवले होते. तो यापूर्वी आयपीएल सामना पाहण्यासाठी चेन्नईला सायकलने गेला होता. पण, अद्याप त्या चाहत्याला सोडण्यात आल्याची कोणतीही बातमी नाही.
