केएल राहुल जेव्हा केक कट करत असताना त्याच्यामागे गौतम गंभीर आणि रोहित शर्मा उभे होते, तेव्हा दोघांमध्ये गहन चर्चा सुरू होती. तेव्हाच विराट त्यांच्याजवळून गेला. केक कट करत असताना विराटला तिकडे थांबण्यासाठी विनंती केली गेली, पण त्याने हात हलवून थांबायला नकार दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कोहलीने अशाप्रकारे इग्नोर केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गंभीरमुळे कोहली सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला नाही, अशा कमेंट काही चाहत्यांनी केल्या आहेत. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधलं वातावरण खराब असल्याचं वृत्तही समोर आलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही अनुभवी खेळाडूंचं कोच गौतम गंभीरसोबतचं नातं प्रभावित झालं आहे, ज्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे, असा खळबळजनक दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराटने शतक तर रोहितने अर्धशतक केलं, याचसोबत दोघांनीही पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट आणि रोहित खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनीही याबाबत थेट उत्तर देणं टाळलं आहे.
