खरं तर टॉसच्या वेळेस रवि शास्त्रींनी पहिल्यांदा एडन मार्करमशी बातचीत केली.त्यानंतर त्याने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी बातचीत केली आहे.यावेळी टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेबाबत विचारताना रवि शास्त्री यांच्या हातून मोठी चूक घडली आहे.रवी शास्त्री बोलता बोलता टी20 वर्ल्ड कप सहा महिने दूर असल्याचे बोलून गेले.पण प्रत्यक्षात टी20 वर्ल्डकप हा दोन महिने दूर आहे.त्यामुळे रवि शास्त्रींनी ज्या सहा महिन्यांचा उल्लेख केला ते पाहून सर्वांनाच झटका बसला.
advertisement
आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याचा आनंद आहे. बोर्डवर धावा टाकणे आणि इथे येऊन बचाव करणे हे एक चांगले आव्हान देते. म्हणजे ते (दव घटक) गोलंदाजांसाठी थोडे आव्हानात्मक बनते. तुम्ही या वस्तुस्थितीपासून पळून जाऊ शकत नाही. पण येथून पुढे, मला वाटते की ते खरोखर बराच काळ राहणार आहे. ते खूप काळापासून आहे. म्हणून जर आपण त्यावर लक्ष केंद्रित करत राहिलो, तर मला वाटते की ते करण्यात मुख्य काम अडचणीत येईल,असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
आमची ऑस्ट्रेलियामध्ये चांगली मालिका होती. आता आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी20 खेळतो आणि नंतर आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खेळतो, म्हणून 15 चांगले टी20. मला वाटते की ही चांगली तयारी आहे. गेल्या काही मालिकांमध्ये आपण जे करत आहोत तेच: निर्भय राहा, खेळाचा आनंद घ्या आणि पुढील तीन तास खेळात सहभागी व्हा,असे सूर्यकुमार यादवने सांगितले.
या सामन्यातून संजू सॅमसन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांना डच्चू देण्यात आला आहे. दोन ऑलराऊंडर आणि एका स्पिनरसह टीम इंडिया या सामन्यात मैदानात उतरली आहे.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) , एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
