साऊथ आफ्रिकेचा लुंगी एनगिडी तिसरी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. यावेळी सूर्यकुमार यादव स्ट्राईकवर होता. सूर्याने लुंगी एनगिडीची पहिला बॉल डॉट केला.त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर षटकार मारला.अशाप्रकारे लुंगीने पहिल्यांदा सूर्याला लालच दिली,त्यानंतर त्याला ट्रॅपमध्ये अडकवत एडन मार्करमच्या हातात कॅट देऊन आऊट व्हायला भाग पाडले.त्यामुळे सूर्यकुमार यादव 12 वर बाद झाला.
advertisement
सूर्यकुमार आधी लुंगी एनगिडीने शुभमन गिलला अशाचप्रकारे आऊट केले होत. पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर शुभमन गिल कॅच आऊट होऊन बसला होता. त्यामुळे भारताचे 17 धावांवर 2 विकेट पडले होते.दरम्यान सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा मैदानात आहेत.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) , एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
