दक्षिण आफ्रिकेच्या त्यांच्या देशाबाहेरचा हा सगळ्यात मोठा वनडे विजय आहे. भारताकडून अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना 2-2 विकेट मिळाल्या, तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा लकी मॅन
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाचं कमबॅक झालं. रांचीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टेम्बा बऊमा खेळला नव्हता, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. पण आता बऊमाचं कमबॅक होताच दक्षिण आफ्रिका विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. याआधी टेम्बा बऊमा कर्णधार झाल्यापासून दक्षिण आफ्रिकेने 12 टेस्ट मॅच खेळल्या, ज्यापैकी 11 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर एक सामना ड्रॉ झाला.
advertisement
विराट-ऋतुराजची शतकं
विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची शतकं आणि कर्णधार केएल राहुलच्या अर्धशतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 50 ओव्हरमध्ये 358/5 एवढा स्कोअर केला. ऋतुराज गायकवाडने 83 बॉलमध्ये 105 आणि विराटने 93 बॉलमध्ये 102 रनची खेळी केली. केएल राहुलने 43 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले.
