लाईव्ह सामन्यातला रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बाऊंन्ड्री लाईन उभा असल्याचे दिसत आहे.त्याच्या बाजूला रिषभ पंत उभा आहे. या दरम्यान रोहित शर्मा ही WISH मागतो.खरं तर लहाणपणी खूप जणांनी अशाप्रकारे WISH मागितल्या असतील.आपल्या डोळ्याचं एखाद केस तुटलं असेल तर ते हातावर ठेवून आपली जी इच्छा आहे ती मागायची त्याच्यानंतर फुंकर मारून तो केस उडवायचा. अशाप्रकारे आपण मागितलेली WISH पुर्ण होते, असा अनेकांचा समज आहे.
advertisement
अशाचप्रकारे रोहित शर्माने रिषभ पंतच्या सांगण्यावरुन हातावर केस ठेवून आपली इच्छा मांडली आणि फुंकर मारली होती.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे त्याने नेमकी काय WISH मागितली याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण ती WISH पु्र्ण व्हावी असे अनेक चाहत्यांना नक्कीच वाटते.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
