टीम इंडियाने कोलकाता टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं. अशातच आता गुवाहाटीवर वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे शुभमन गिलने जी चूक केली, ती चूक ऋषभने केली नाही. तसेच आता साई सुदर्शनला देखील संघात घेऊन ऋषभने टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत केली आहे. गंभीरने चेंज केलेली बॅटिंग ऑर्डर ऋषभने चेंज केली आहे.
advertisement
ऋषभ पंत टीम इंडियामध्ये पुन्हा राईटी फेल्टी कॉम्बिनेशन घेऊन आला आहे. तसेच बॉलर्सवर विश्वास दाखवत साऊ सुदर्शनला टीममध्ये घेऊन बॅटिंग ऑर्डर आणखी मजबूत केली. रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर या तीन ऑलराऊंडरसोबत टीम इंडिया मैदानात उतरली आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (C), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (WK), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (C/WK), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
