खरं तर दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया कर्णधार टेम्बा बावुमा आणि एडन मार्करमचा अभ्यास करून आली पण मैदानात भलताच पेपर आला होता. साऊथ आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर 6 विकेट गमावून 247 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे दुसऱ्या दिवशी साऊथ आफ्रिका लवकर ऑल आऊट होईल अशी अपेक्षा होती. पण साऊथ आफ्रिकेच्या सेनुरन मथुसामीने 109 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 10 चौकार मारले होते. त्याच्यासोबत मार्को यान्सने 93 धावांची खेळी केली होती.या खेळीत त्याने 7 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या शतकीय आणि अर्धशतकीय खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या आहेत.
advertisement
दरम्यान साऊथ आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि रॅन रिकल्टनने साऊथ आफ्रिकेच्या डावाची सूरूवात केली होती. एडन मार्करम 38 धावांवर जसप्रीत बुमराहच्या बॉलवर क्लिन बोल्ड झाला होता.तर रॅन रिकल्टन 35 धावांवर कुलदीप यादवच्या बॉलवर विकेटमागे कॅचआऊट झाला होता.
सलामीवीर बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा फलंदाजीसाठी मैदानात आले होते. यावेळी दोन्ही खेळाडूंनी मैदानात टीचून फलंदाजी केली होती. यावेळी टेम्बा बावुमा आपलं अर्धशतक ठोकेल असे वाटत असताना रविंद्र जडेजाने त्याला जाळ्यात फासले आणि टेम्बा यशस्वीच्या हातात कॅच देऊन बसला. विशेष म्हणजे ही कॅच खूप कठीण होती पण जयस्वालने पुढे डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतली.त्याच्या पाठोपाठ ट्रिस्टन स्टब्सही चांगला लयीत खेळत होता. तो आपलं अर्धशतक ठोकेल असे वाटत असताना कुलदीप यादवने त्याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुलकडे कॅच देऊन आऊट केले. अशाप्रकारे ट्रिस्टन स्टब्स 49 धावांवर बाद झाला.ज्यामुळे त्याचे अर्धशतक हुकलं.
त्यानंतर टोनी डे झोर्झी आणि विआन मुल्डर मैदानात आला होता. यावेळी कुलदीप यादवने पुन्हा फिरकीची जादू दाखवत विआन मुल्डरला आऊट केले.मुल्डर 25 धावांवर बाद झाला.त्यानंतर सामन्याच्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टोनीला सिराजला विकेटमागे कॅच आऊट केले. अशाप्रकारे टोनी 28 वर बाद झाला होता. त्यामळे साऊथ आफ्रिका दिवसअखेर 6 विकेट गमावून 247 धावावर खेळत होती.
टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान सध्या ज्याप्रमाणे साऊथ आफ्रिकेने दोन दिवस बॅटींग करून बलाढ्य स्कोर उभा केला आहे. ते पाहता टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची कमीच शक्यता आहे.त्यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे.
