शुभमनच्या जागेवर नितिश कुमार रेड्डी
शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात मानेच्या दुखापतीमुळे तो फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर निवृत्त झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तो सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. अशातच आता टीम इंडियामध्ये मोठे बदल झाले आहेत. शुभमनच्या जागेवर नितिश कुमार रेड्डीचा समावेश करण्यात आला आहे. तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर साई सुदर्शन याचा संघात घेण्यात आलंय.
advertisement
टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत
टीम इंडियाने कोलकाता टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं होतं. अशातच आता गुवाहाटीवर वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे शुभमन गिलने जी चूक केली, ती चूक ऋषभने केली नाही. तसेच आता साई सुदर्शनला देखील संघात घेऊन ऋषभने टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत केली आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वायन मुल्डर, टेम्बा बावुमा (C), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (WK), मार्को जॅन्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (C/WK), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
