पाचव्याच बॉलवर माघारी पाठवलं
साऊथ अफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकेलटन याला संघात स्थान दिल्यानंतर त्याला तिसऱ्या वनडे मॅचमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंगने त्याला पाचव्याच बॉलवर त्याला माघारी पाठवलं. पहिल्या बॉलपासून अर्शदीपने रायनला खेळण्यास तयार केलं अन् पाचव्या बॉलवर रायनला आपल्या जाळ्यात अडकवलं.
पाहा Video
advertisement
दरम्यान, पहिल्या दोन वनडे साम्यात रायन रिकल्टनला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. अशातच तिसऱ्या सामन्यात रायनला मैदानात टिकता आलं नाही. सध्या क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन टेम्बा बावुमा मैदानावर आहेत.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिळक वर्मा, केएल राहुल (C), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
