5 टी-20 सामन्याच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. तर लखनऊमधला चौथा टी-20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या टीमची निवड होण्याआधी टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. उद्या म्हणजेच शनिवार 20 डिसेंबरला टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड होणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलची टीम इंडियात निवड होणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मागच्या 18 टी-20 सामन्यात शुभमन गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, यानंतर आता गिलला दुखापतही झाली आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हादेखील संघर्ष करत आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी एकाच टीमची निवड होण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे, तर 8 मार्चला वर्ल्ड कपची फायनल आहे.
advertisement
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिकेची टीम
क्विंटन डिकॉक, रीझा हेन्ड्रिक्स, एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिन्डे, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओडनिल बार्टमन
