टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा यांसारखे अनुभवी आणि युवा खेळाडू एकत्र दिसणार आहेत. तसंच रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या ऑलराउंडर्समुळे टीमचा बॅलन्स अधिक मजबूत झाला आहे. बॉलिंगमध्ये प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या नव्या चेहऱ्यांनीही या मालिकेत चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
ऋतुराजचं कमबॅक
गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय टीमबाहेर असलेला आक्रमक फलंदाज, सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे भारतीय टीममध्ये पुनरागमन झाले आहे. गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. रणजी क्रिकेट स्पर्धेत आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवल्याने अखेर ऋतुराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निवड करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेट कीपर), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
