बुमराह-सिराजला विश्रांती
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या टेस्टमध्ये हे दोघं खेळत आहेत. वनडे सीरिजमध्ये त्यांच्या जागी हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वनडे टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.
दोन बॅटरनाही वगळलं
सध्या भारताच्या टेस्ट टीममध्ये असलेल्या साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनाही वनडे टीममध्ये स्थान देण्यात आले नाही. साई सुदर्शनला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळाली नाही, पण दुसऱ्या कसोटीसाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, पडिक्कलला दोन्ही टेस्टमध्ये स्थान देण्यात आले नाही. पडिक्कलने अजून वनडेमध्ये पदार्पण केलेले नाही. सुदर्शनने आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत.
advertisement
अक्षर पटेललाही स्थान नाही
स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेललाही वनडे सीरिजमधून वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याला स्थान देण्यात आले नाही. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये तो तिन्ही सामने खेळला.
वनडे सीरिजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेट कीपर), ऋषभ पंत (विकेट कीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
