ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजआधी निवड समितीने रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून शुभमन गिलकडे दिली, तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार केलं गेलं, पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी श्रेयस अय्यरही फिट व्हायची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजवेळी श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरिज खेळले नाहीत, तर केएल राहुलकडे टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर केएल राहुलच टीममधला सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे त्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. गिल आणि श्रेयस दोघंही दुखापतीतून बरे झाले नाहीत तर तिलक वर्माला संधी मिळू शकते.
advertisement
हार्दिक-बुमराहला विश्रांती
हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहदेखील वनडे सीरिजमधून बाहेर राहू शकतात. हार्दिक पांड्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एक्स फॅक्टर ठरू शकतो. सध्या हार्दिक जांघेच्या दुखापतीतून बरा होत आहे, तसंच तो टी-20 वर्ल्ड कपपर्यंत फक्त टी-20 फॉरमॅटवरच लक्ष केंद्रीत करणार आहे, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सीरिज आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळण्याची शक्यता आहे.
वर्क लोड मॅनेजमेंटमुळे टीम इंडिया बुमराहला वनडे सीरिजमधून विश्रांती देऊ शकते. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौरा, आशिया कप, वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सीरिज, ऑस्ट्रेलिया दौरा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज असं सातत्याने क्रिकेट खेळत आहे, त्यामुळे बुमराहला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं वनडे टीममध्ये कमबॅक होणं निश्चित मानलं जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माने एक शतक आणि अर्धशतक केलं होतं, तर विराटने लागोपाठ दोन सामन्यात शून्यवर आऊट झाल्यानंतर अर्धशतकी खेळी केली होती.
वनडे सीरिजसाठी संभाव्य टीम
विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हर्षीत राणा, मोहम्मद सिराज
