TRENDING:

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका वनडे, T20 सीरिजसाठी टीमची घोषणा, 'खतरनाक' बॉलरचं कमबॅक!

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे. दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. 30 नोव्हेंबरपासून दोन्ही टीममध्ये वनडे सीरिज खेळवली जाईल. या वनडे सीरिज आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. वनडे सीरिजसाठी टेम्बा बऊमा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असेल.
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे, T20 सीरिजसाठी टीमची घोषणा, 'खतरनाक' बॉलरचं कमबॅक!
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे, T20 सीरिजसाठी टीमची घोषणा, 'खतरनाक' बॉलरचं कमबॅक!
advertisement

वनडे सीरिजमध्ये फास्ट बॉलर कागिसो रबाडा खेळणार नाही. टेस्ट सीरिजआधी प्रॅक्टिस सेशनवेळी रबाडाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विकेट कीपर क्विंटन डिकॉकचंही दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये कमबॅक झालं आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये डिकॉकने उत्कृष्ट कामगिरी केली होती. 3 इनिंगमध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 232 रन केले होते.

advertisement

प्रिटोरियसला संधी नाही

पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लुहान डि प्रिटोरियसला भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही. तर एडन मार्करमचं टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे. डोनोवन फरेराऐवजी मार्करम टीमचं नेतृत्व करेल. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये न खेळलेला केशव महाराज भारताविरुद्ध वनडे खेळणार आहे.

advertisement

एनरिक नॉर्कियाचं टी-20 मध्ये कमबॅक

मागच्या वर्षी भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला फास्ट बॉलर एनरिक नॉर्कियाचं टी-20 टीममध्ये कमबॅक झालं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची वनडे टीम

टेम्बा बऊमा (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डिकॉक, टोनी डि जॉर्जी, रुबिन हरमन, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, रियान रिकलटन, प्रेनेलन सुब्रायन

advertisement

दक्षिण आफ्रिकेची टी-20 टीम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

एडन मार्करम (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यानसन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ट्रिस्टन स्टब्स

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका वनडे, T20 सीरिजसाठी टीमची घोषणा, 'खतरनाक' बॉलरचं कमबॅक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल