द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, शुभमन गिलला गुवाहाटीमध्ये खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. पहिल्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर गिलला कोलकात्यामधल्या रुग्णालयात नेण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला. शुभमन गिल हा टीम इंडियासोबत गुवाहाटीला जाईल, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर देखरेख केली जाईल, असं बीसीसीआयने निवेदन जारी करून सांगितलं.
advertisement
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 'दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली आणि दिवसाच्या खेळानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. शुभमन गिल उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे आणि 19 नोव्हेंबर 2025 रोजी तो टीमसोबत गुवाहाटीला जाईल'.
सीरिज वाचवण्याचं टीम इंडियासमोर चॅलेंज
कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 30 रननी पराभव केला, त्यामुळे भारतीय टीमला कोणत्याही परिस्थितीत दुसरी कसोटी जिंकावी लागेल अन्यथा सीरिज त्यांच्या हातातून निसटेल. मंगळवारी ईडन गार्डन्सवर टीमने पर्यायी सराव सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सुदर्शन, ध्रुव जुरेल, आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि देवदत्त पडिकल हे खेळाडू उपस्थित होते.
