वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा संधी
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाची बॅटिंग चांगली झाली पण बॉलिंगमध्ये बॉलर्सने खूर मार खाल्ला. खासकरून स्पिनर्सला चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता प्लेइंग इलेव्हनमध्ये एक्ट्रा बॉलर आणण्याची शक्यता होती. वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर नितीश कुमार रेड्डी खेळेल, असं वाटत असताना केएल राहुलने पुन्हा गौतम गंभीरच्या फेवरेटला संधी दिली आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
आतापर्यंत रायपूरमध्ये फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. जानेवारी 2023 मध्ये भारताने न्यूझीलंडला 8 विकेट्सने हरवले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 59 एकदिवसीय सामने समोरासमोर खेळले गेले आहेत. भारताने 28 जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने 30 एकदिवसीय सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांनी भारतात 25 सामने खेळले, ज्यामध्ये टीम इंडियाने 15 जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने 10 सामने जिंकले.
