TRENDING:

IND vs SA : सीरिज जिंकली, पण एकाच्याच कामगिरीने नाराज, कॅप्टन सूर्याने कॅमेरासमोर घेतलं खेळाडूचं नाव!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 30 रननी विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 30 रननी विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 3-1 ने जिंकली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाने मिळवलेला हा विजय आणखी दिलासादायक आहे, कारण आता वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाचे फक्त 5 सामने शिल्लक आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडिया घरच्या मैदानात लागोपाठ 18 सीरिज जिंकली आहे.
सीरिज जिंकली, पण एकाच्याच कामगिरीने नाराज, कॅप्टन सूर्याने कॅमेरासमोर घेतलं खेळाडूचं नाव!
सीरिज जिंकली, पण एकाच्याच कामगिरीने नाराज, कॅप्टन सूर्याने कॅमेरासमोर घेतलं खेळाडूचं नाव!
advertisement

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सीरिजनंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिज झाल्यानंतर 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजवेळी टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग फॉर्ममध्ये आल्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे, पण तरीही टीम इंडियाचा कर्णधार एका खेळाडूच्या कामगिरीमुळे नाराज आहे.

advertisement

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजनंतर मुरली कार्तिकसोबत बोलताना खेळाडूंच्या कामगिरीवर उघडपणे भाष्य केलं. 'टीम म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक गोष्ट योग्य केली. फक्त एकच गोष्ट आम्हाला करता आली नाही, ती म्हणजे बॅट्समन सूर्या आम्हाला सापडलाच नाही. तो कुठे तरी हरवला आहे, पण तो लवकरच जोमाने पुनरागमन करेल', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

advertisement

मागच्या 13 ते 14 महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हा बॅटने संघर्ष करत आहे. मागच्या 22 टी-20 इनिंगमध्ये सूर्यकुमार यादवला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. सूर्यकुमार यादवचं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातलं अर्धशतक ऑक्टोबर 2024 साली आलं होतं. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा शनिवारी होणार आहे, पण त्याआधी सूर्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही सूर्या 5 रनवर आऊट झाला.

advertisement

हार्दिकचा धमाका

पाचव्या टी-20 सामन्यात भारताने दिलेल्या 232 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 201/8 एवढा स्कोअर करता आला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहला 2, अर्शदीप आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 35 बॉलमध्ये 65 रन केले, याशिवाय डेवाल्ड ब्रेविसने 17 बॉलमध्ये 31 रनची खेळी केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दरात चढ-उतार, केळी आणि तिळाला काय मिळाला शुक्रवारी भाव? Video
सर्व पहा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर सुरूवातीपासूनच भारतीय बॅटरनी दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 25 बॉल 63 तर तिलक वर्माने 42 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली. अभिषेक शर्माने 34 आणि संजू सॅमसनने 37 रन केले. सूर्यकुमार यादव 5 रन करून आऊट झाला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : सीरिज जिंकली, पण एकाच्याच कामगिरीने नाराज, कॅप्टन सूर्याने कॅमेरासमोर घेतलं खेळाडूचं नाव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल