टेम्बा बावुमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत टेम्बा बावुमाची संपूर्ण जर्नी दाखवली आहे. या व्हिडिओत बावुमा म्हणतो, "माझ्या आयुष्यात मला खूप नावांनी हाक मारली गेली, काही नावांमुळे मी दुखावलं गेलो,असे तो म्हणताना दिसत आहे.त्यामुळे बुमराहच्या बुटक्या बोलण्यामुळे तो दुखावल्याचे बोलले जात आहे.
"माझ्या आयुष्यात मला खूप नावांनी हाक मारली गेली, काही नावांमुळे मी दुखावलं गेलो,पण मला सर्वात जास्त जे नाव बोलावले गेले ते टेम्बा आहे.माझ्या आजीने माझे नाव टेम्बा ठेवले कारण त्याचा अर्थ "आशा" (Hope), आपल्या समाजासाठी आणि देशासाठी आशा आहे. तसेच आशा या ठिकाणाहू येते (ज्यावेळेस टेम्बा ठिकाण म्हणतो,त्यावेळेस त्याचं जुन घरं दाखवलं जातं)त्याचसोबत समाजाची माणसंही दाखवत या लोकांकडून सकारात्मकता येते, इथूनच मला ऊर्जा मिळते असे टेम्बा बावुमा व्हिडिओत सांगताना दिसतो.
दरम्यान टेम्बा बावुमाचा हा व्हिडिओ जुना असल्याच बोललं जात आहे. एका जाहिरातीचा प्रचार करण्यासाठी टेम्बाने हा व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये टेम्बा बावुमाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा जुना व्हिडिओ शेअर करून टेम्बा बावुमाने बुमराहला उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.पण व्हिडिओत कुठेच बावुमाने जसप्रीत बुमराहच नाव घेतलेलं नाही आहे.
नेमका वाद काय झालेला?
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सूरू असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा राडा झाला होता. लाईव्ह सामन्यात गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह 'तो बुटका आहे,असं म्हणाला होता.बुमराहचा या संदर्भातला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यामुळे बुमराहवर प्रचंड टीकाही झाली होती.
या सर्व वादानंतर सामन्याच्या निकालाच्या दिवशी जसप्रीत बुमराहची गळाभेट घेतली होती. त्याचसोबत तो बावुमासोबत चर्चा करताना दिसला होता. या संदर्भातला फोटो देखील व्हायरल झाला होता.त्यानंतर बुमराहने बावुमाशी चर्चा करून वादावर पडदा टाकल्याचे बोलले जात आहे.
