पावसाचा व्यत्यय, तरी भारताचा विजय
टॉस जिंकल्यानंतर पहिले बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा 245 रनवर ऑलआऊट झाला. जेसन राऊल्सने 114 रनची उत्कृष्ट शतकी खेळी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 200 पार गेला. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने सुरूवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. वैभव आऊट झाल्यानंतर खराब हवामान आणि पावसामुळे मॅच दोनवेळा थांबवण्यात आली, यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी 27 ओव्हरमध्ये 174 रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान भारताने 8 विकेट शिल्लक असताना 23.3 ओव्हरमध्ये पार केलं. वेदांत त्रिवेदीने नाबाद 31 आणि अभिज्ञान कुंडूने नाबाद 48 रन केले.
advertisement
वैभव सूर्यवंशीची वादळी बॅटिंग
वैभव सूर्यवंशीने 19 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. 24 बॉलमध्ये 68 रनची वादळी खेळी करून वैभव आऊट झाला. 283 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणाऱ्या वैभवने 10 सिक्स आणि एक फोर मारली. या कामगिरीबद्दल वैभवला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
किशन कुमारची भेदक बॉलिंग
टीम इंडियाच्या बॉलरनीही या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. किशन कुमारने नव्या बॉलने भेदक मारा केला, त्याला सामन्यात 4 विकेट मिळाल्या. तर आरएस अम्ब्रीशला 2, दीपेश देवेंद्रन-कनिष्क चौहान आणि खिलन पटेलला एक-एक विकेट घेण्यात यश आलं. किशन कुमारने त्याच्या ओपनिंग स्पेलमध्येच दक्षिण आफ्रिकेची अवस्था 57/3 अशी केली होती. यानंतर जेसन राऊल्सच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला 240 रनचा टप्पा पार करता आला. राऊल्सशिवाय डेनियल बॉसमनने 31 आणि अदनान लगादियानने 25 रन केले.
