मार्करमचा सुपरमॅन कॅच
टीम इंडियाकडे विजयीची मोठी संधी होती. पण साऊथ अफ्रिकन खेळाडूंनी गेम पलटला. टीम इंडियाच्या खेळाडूंना मैदानात टिकून राहता आलं नाही. साई सुदर्शन, ध्रुव जुरैल आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी मिळूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाचा अर्धा संघ माघारी परतलाय. अशातच साऊथ अफ्रिकेच्या अॅडम मार्करम याच्या फिल्डिंगची चर्चा होताना दिसतीये. मार्करमने नितीश कुमार रेड्डीचा सुपर कॅच घेतला.
advertisement
मार्को जान्सेनचा बाऊंसर झेपला नाही
नितीश कुमार रेड्डी याला संधी मिळाल्यानंतर मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. मात्र, नितीशला मार्को जान्सेन याचा बाऊंसर झेपला नाही. बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागून कॅच लांब उडाला. तिथं सेकंड स्लीपला उभा असलेल्या मार्करमने लांब उडी मारून अफलातून कॅच पकडला. हा कॅच पाहून अनेकांच्या त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. जडेजाने देखील डोक्याला हात लावल्याचं पहायला मिळालं.
साऊथ अफ्रिकेची चॅम्पियन बॅटिंग
दरम्यान, आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामीने जबरदस्त संयम दाखवत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि 107 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला मार्को जान्सेनने आक्रमक साथ दिली. जान्सेनने भारतीय गोलंदाजीची पिसं काढत 93 धावा कुटल्या होत्या. आता टीम इंडियाला अडखळत स्कोरकार्ड पळवावा लागतोय.
