India vs South Africa : रायपूरमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग साऊथ आफ्रिकेकडून सूरू असताना भारताच्या एका युवा खेळाडूकडून मोठी चूक घडली आहे. विशेष ही त्याची पहिली चूक नाही आहे,याआधीही त्याच्याकडून अनेक चूका घडल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्यावर रोहित शर्मा देखील संतापला होता. कारण त्याच्या एका चुकीमुळे भारत इंग्लंडमध्ये हारला होता. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आहे. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या वनडे सामन्यात मोठी चूक केली आहे.त्याचं झालं असं की 17 वी ओव्हर घेऊन कुलदीप यादव मैदानात आला होता.त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर एडन मार्करमने फ्लॅट सिक्स मारायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात यशस्वी जयस्वालच्या हातात थेट कॅच गेली होती.मात्र त्याने ही कॅच ड्रॉप केली होती. विशेष म्हणजे जयस्वालने नुसती कॅच ड्रॉप केली नाही तर खराब फिल्डिंग केली.ज्यामुळे बॉल थेट सिमारेषे पार गेला होता.
ज्यावेळेस जयस्वालने कॅच ड्रॉप केली त्यावेळेस मार्करम 53 वर खेळत होता.त्यामुळे त्याला एक मोठं जिवनदान मिळालं होतं. या जीनवदानाचा फायदा उचलून आता तो शतक ठोकतो का? हे पाहावे लागणार आहे.असं जर झालं तर टीम इंडियाची प्रचंड निराशा होणार आहे.
दरम्यान यशस्वी जयस्वालची ही पहिली वेळ नाही आहे,याआधी देखील त्याने अनेक सामन्यात कॅच ड्रॉप केल्या आहेत. यामुळे भारताला इंग्लंड विरूद्ध पराभवाला देखील सामोरे जावे लागले होते.यावेळी रोहित शर्मा देखील त्याच्यावर संतापला होता. पण रोहित इतका संताप करून देखील यशस्वी जयस्वाल काय सुधारला नाही आहे आणि तशीच चूक करत चालला आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
क्विंटन डी कॉक (WK), एडन मार्कराम, टेम्बा बावुमा (C), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (w/c), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
