रवींद्र जडेजाशिवाय केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनीही शतकी खेळी केली. केएल राहुल 100 रनवर तर ध्रुव जुरेल 125 रनवर आऊट झाले. ध्रुव जुरेलचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे. तर रवींद्र जडेजाने टेस्ट क्रिकेटमधलं त्याचं सहावं शतक झळकावलं. केएल राहुलचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 11 वं शतक होतं. तब्बल 9 वर्षांनंतर केएल राहुलने भारतामध्ये टेस्ट शतक केलं आहे. राहुलने याआधी भारतात डिसेंबर 2016 साली चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक केलं होतं, त्यानंतर राहुलला भारतामध्ये शतक करता आलं नव्हतं.
advertisement
दुसरीकडे कर्णधार शुभमन गिल यानेही 50 रनची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोस्टन जेसने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर खेरी पेयर, जोमेल वारिकन आणि जेडेन सिल्ल यांना 1-1 विकेट मिळाली.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा 162 रनवर ऑलआऊट झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बुमराहला 3 आणि कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या. वॉशिंग्टन सुंदरलाही एक विकेट घेण्यात यश आलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे, त्यामुळे या सीरिजच्या दोन्ही टेस्टमध्ये विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी टीम इंडियाला आहे. भारतीय टीम सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.