TRENDING:

IND vs WI 1st Test : टीम इंडियाने 448 धावांवर घोषित केला डाव, शुमभनने तयार केला 120 मिनिटात मॅच जिंकण्याचा प्लॅन!

Last Updated:

IND vs WI India declared 1st inning : तिसऱ्या दिवसाची सुरूवात होण्याआधीच भारताने आपला पहिला डाव घोषित केला आहे आणि वेस्ट इंडिज आज प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs WI Ahmedabad Test : अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी मॅचचा (Test Match) दुसरा दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 बाद 448 धावा करत वेस्ट इंडिजच्या 162 धावांवर 286 धावांची मोठी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तब्बल तीन फलंदाजांनी शतकं झळकावली होती. अशातच तिसऱ्या दिवसाआधी टीम इंडियाने मोठा निर्णय घेतला असून भारतीय संघाने 448 वर पहिला डाव घोषित केला आहे.
IND vs WI India declared 1st inning
IND vs WI India declared 1st inning
advertisement

सामना खिशात घालण्याचा प्लॅन

तिसऱ्या दिवसाची सुरूवात होण्याआधीच भारताने आपला पहिला डाव घोषित केला आहे आणि वेस्ट इंडिज आज प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरेल. त्यांनी त्यांचा दुसरा डाव सुरू करताना हलका रोलर मागितला आहे, तरीही भारताच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपासून ते अजूनही 286 धावा दूर आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच मॅच संपवण्यासाठी पहिल्याच सेशनमध्ये वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळून सामना खिशात घालण्याचा प्लॅन टीम इंडियाचा आहे.

advertisement

टीम इंडियाचा स्कॉड - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास घेत नाही एकही रुपया, डॉक्टर नाही देवमाणूस!
सर्व पहा

वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 1st Test : टीम इंडियाने 448 धावांवर घोषित केला डाव, शुमभनने तयार केला 120 मिनिटात मॅच जिंकण्याचा प्लॅन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल