रेड्डीने डाव्या बाजूला डाईव्ह मारला अन्...
आठवी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजचा बॅक-ऑफ-लेंथ बॉल चंद्रपॉलने ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करणाऱ्या रेड्डीने डाव्या बाजूला डाईव्ह मारला आणि दोन्ही हातांनी उडता कॅच घेतला. रेड्डीचा रिअॅक्शन टाइम एका सेकंदापेक्षा कमी होता. पण रेड्डीने कॅच सोडला नाही.
भारतीय बॉलर्सचा दबदबा
पहिल्या कसोटी मॅचचा (Test Match) दुसरा दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 बाद 448 धावा करत वेस्ट इंडिजच्या 162 धावांवर 286 धावांची मोठी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तब्बल तीन फलंदाजांनी शतकं झळकावली होती. तर त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सचा दबदबा राहिला आहे.
टीम इंडियाचा स्कॉड - शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.