विद्यमान विजेत्या भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा भारताने एकतर्फी सामन्यात 9 गडी राखून पराभव केला. परुनिका सिसोदियाच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजला फक्त 44 धावांवर गुंडाळले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत 26 चेंडूत लक्ष्य पूर्ण करून सामना जिंकला.
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला; प्रिय व्यक्तींना गमावले
advertisement
भारताने आयसीसी महिला अंडर-19 टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत केले. भारतीय कर्णधार निकी प्रसादने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरवत वेस्ट इंडीजची संपूर्ण फलंदाजी अवघ्या 14 षटकांत संपवली. वेस्ट इंडिज संघातील 11 पैकी 9 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतासाठी परुनिका सिसोदियाने अप्रतिम गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय आयुषी आणि जोसिथाने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले.
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला...
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झटका बसला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर गोंगडी त्रिशा बाद झाली. पहिल्या षटकात विकेट पडल्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. भारताच्या जी. कमलिनी (16) आणि सानिका चाळके (18) यांनी आक्रमक खेळ करत सहज विजय मिळून दिला.
स्पर्धेत भारत अ गटात असून या गटात श्रीलंका, मलेशिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. स्पर्धेत एकूण 16 संघ असून त्यांना 4 गटात विभागण्यात आले आहे. गटफेरीतील प्रत्येकी 3 संघ सुपर 6 फेरीत पोहोचतील.भारताची दुसरी मॅच 21 जानेवारी रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे.