मार्च महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट आणि रोहित भारताकडून खेळलेले नाहीत. 2024 मध्येच दोघांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर या वर्षी इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून दोघांच्याही वनडे क्रिकेटमधल्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
रोहितच्या कॅप्टन्सीचं काय?
रोहितने टी-20 आणि टेस्टमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो वनडे क्रिकेट खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल ही भारताची शेवटची वनडे होती, ज्यात रोहित कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पण आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे टीमचा कर्णधार असणार का? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. वनडे कॅप्टन्सीबद्दल बीसीसीआय उद्याच्या निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माबाबत चर्चा करणार असल्याचंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
advertisement
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. 19 ऑक्टोबर (पर्थ), 23 ऑक्टोबर (ऍडलेड) आणि 25 ऑक्टोबर (सिडनी) ला 3 वनडे मॅच खेळवल्या जाणार आहेत. यानंतर दोन्ही टीममध्ये 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान 5 टी-20 मॅचची सीरिज होईल. बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे टीमसोबतच टी-20 टीमचीही घोषणा करण्याची शक्यता आहे.