भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टेस्ट सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 25 जानेवारी रोजी टेस्ट सीरिजमधील पहिला सामना हैद्राबाद येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवून भारताचा पराभव केला, त्यामुळे सध्या सिरीजमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे.
धोनीच्या अत्यंत जवळची व्यक्ती ED च्या रडारवर, कंपनीवर छापेमारी
advertisement
दुसऱ्या टेस्ट सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे खेळताना दिसणार नाहीत. तर विराट कोहलीने पूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीच्या दोन सामन्यातून माघारी घेतली होती. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. रवींद्र जडेजा आणि राहुल दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, रजत पाटीदार किंवा सौरभ कुमार यांच्यापैकी कोणा दोघांना संधी दिली जाऊ शकते.
कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील सर्व सामने हे जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18 वर पाहता येऊ शकतात. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 : 30 वाजता सामना सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास आधी टॉस करण्यात येईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव.
