धोनीच्या अत्यंत जवळची व्यक्ती ED च्या रडारवर, कंपनीवर छापेमारी
- Published by:Shreyas
Last Updated:
देशभरामध्ये ईडीकडून सुरू असलेल्या छापेमारीचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत नेत्यांवर ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असताना आता धोनीचा अत्यंत जवळच्या व्यक्तीची कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे.
मुंबई : देशभरामध्ये ईडीकडून सुरू असलेल्या छापेमारीचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत नेत्यांवर ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असताना आता धोनीचा अत्यंत जवळच्या व्यक्तीची कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये इंडिया सिमेंट्सच्या परिसरात ईडीने छापेमारी केली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन इंडिया सिमेंट्सचे एमडी आणि उपाध्यक्षही आहेत. महसुलाच्या दृष्टीने इंडिया सिमेंट्स भारतातली 9वी सगळ्यात मोठी सिमेंट कंपनी आहे. इंडिया सिमेंट्सचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 7 प्लांट्स आहेत.
2008 ते 2014 या काळात इंडिया सिमेंट्स आयपीएल टीम असलेल्या सीएसकेची मालक होती, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर इंडिया सिमेंट्सने सीएसकेचा मालकीहक्क चेन्नई सुपरकिंग्स प्रायव्हेट लिमिटेडकडे ट्रान्सफर केला. सीएसकेचा कर्णधार असलेल्या एमएस धोनीला नंतर इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्ष (मार्केटिंग)ही करण्यात आलं. एन श्रीनिवासन एमएस धोनी याचे अत्यंत जवळचे समजले जातात.
चेन्नईतल्या इंडिया सिमेंट्सच्या परिसरात छापेमारी केल्यानंतर ईडी एन श्रीनिवासन यांच्या ठिकाणांचीही तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या छाप्यांमुळे एन.श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढू शकतात.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
Feb 01, 2024 3:57 PM IST








