मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी निवडून न्यूझीलंडला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. यावेळी न्यूझीलंडला विजयासाठी मोठे टार्गेट देण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू शुभमन गिल यांची जोडी मैदानात उतरली. यावेळी रोहित शर्मा आणि शुभमन गिल याने चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. परंतु रोहित शर्मा 47 धावांवर खेळत असताना एका चुकीच्या शॉटमुळे त्याची विकेट पडली.
advertisement
रोहित शर्माने 29 बॉलमध्ये 47 धावा केल्या. झालं असं की रोहित शर्मा त्याचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करत होता. यावेळी त्याने 47 धावा करताना 4 चौकार आणि 4 सिक्स मारले आणि ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड मोडला. परंतु अर्धशतक करण्याच्या अगदी जवळ असताना रोहित शर्माने चुकीचा शॉट मारला आणि तो कॅच आउट झाला. यावेळी विल्यमसनने रोहितचा कॅच पकडला.
टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज