IND vs NZ Semi Final : टॉसपूर्वी वानखेडेवर रंगला फुटबॉलचा खेळ, विराट आणि डेव्हिड बेकहॅमचे Photo Viral
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
टॉसपूर्वी फुटबॉलचा खेळ रंगला ज्यात क्रिकेटचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅममध्ये जुगलबंदी रंगली.
मुंबई, 15 नोव्हेंबर : भारतात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये आज पहिला सेमी फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु यावेळी टॉसपूर्वी फुटबॉलचा खेळ रंगला ज्यात क्रिकेटचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅममध्ये जुगलबंदी रंगली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगला आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी निवडून न्यूझीलंडला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. या सेमीफायनल सामन्यासाठी खास मैदानात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सह फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅम देखील उपस्थित होता. यावेळी सचिन आणि डेव्हिड मैदानात आले असताना त्यावेळी विराट कोहली मैदानात टीम इंडिया सोबत वॉर्मअप करत होता.
advertisement
Virat Kohli passes the football to David Beckham and both are enjoying. (Prajakta)
Sachin, Kohli & Beckham at Wankhede - Picture for lifetime...!!!! pic.twitter.com/eiKB43x86O
— CricketMAN2 (@ImTanujSingh) November 15, 2023
advertisement
विराट कोहलीने डेव्हिड बेकहॅमला पाहताच त्याच्याकडे फुटबॉल पास केला. यावेळी डेव्हिड बेकहॅमने देखील कोहलीने पास केलेलया फुटबॉलला किक मारली आणि काही मिनिटं या दोघांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगलेला पाहायला मिळाला. याप्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2023 2:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ Semi Final : टॉसपूर्वी वानखेडेवर रंगला फुटबॉलचा खेळ, विराट आणि डेव्हिड बेकहॅमचे Photo Viral