World Cup 2023 : रोहित शर्माने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करत घेणार न्यूझीलंडकडून बदला

Last Updated:

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम फलंदाजी करून टीम इंडिया न्यूझीलंडकडून 2019 रोजी झालेल्या पराभवाचा बदल घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड
भारत विरुद्ध न्यूझीलंड
मुंबई, 15 नोव्हेंबर : भारतात सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये आज पहिला सेमी फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम फलंदाजी करून टीम इंडिया न्यूझीलंडकडून 2019 रोजी झालेल्या पराभवाचा बदल घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या फायनल सामन्यात खेळेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कप 2023 मध्ये 9 पैकी 9 साखळी सामने जिंकले असून यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ पॉईंट टेबलमध्ये 9 पैकी 5 सामने जिंकून चौथ्या स्थानी आहे.
advertisement
टीम इंडियाचा संघ सध्या फॉर्मात असल्याने कॅप्टन रोहित शर्माने यात कोणतेही बदल केलेले नाहीत. तर न्यूझीलंड संघाने देखील टीम इंडियाला सेमी फायनल सामन्यात तगडी झुंज देण्यासाठी टीममध्ये बदल केलेले नाहीत.
टीम इंडियाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
advertisement
न्यूझीलंडची प्लेईंग 11 : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन , डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम , मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 : रोहित शर्माने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करत घेणार न्यूझीलंडकडून बदला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement