मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगला आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी निवडून न्यूझीलंडला प्रथम गोलंदाजीची आव्हान दिले. या सेमीफायनल सामन्यासाठी खास मैदानात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सह फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅम देखील उपस्थित होता. यावेळी सचिन आणि डेव्हिड मैदानात आले असताना त्यावेळी विराट कोहली मैदानात टीम इंडिया सोबत वॉर्मअप करत होता.
advertisement
World Cup 2023 : रोहित शर्माने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करत घेणार न्यूझीलंडकडून बदला
विराट कोहलीने डेव्हिड बेकहॅमला पाहताच त्याच्याकडे फुटबॉल पास केला. यावेळी डेव्हिड बेकहॅमने देखील कोहलीने पास केलेलया फुटबॉलला किक मारली आणि काही मिनिटं या दोघांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगलेला पाहायला मिळाला. याप्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.