टेम्बाने हुकमी एक्का काढला
13 धावांवरून टीम इंडियाचा खेळ तिसऱ्या दिवशी सुरू झाला. त्यावेळी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिला एक तास साऊथ अफ्रिकेला झुंजवलं. मात्र, टेम्बा बावुमाने आपली कोलकातावरील विजयाचा हुकमी एक्का काढला. सायमन हार्मर याने बॉलिंगला सुरूवात केली अन् टीम इंडियाचे खेळाडू कोलमडू लागले. सायमन हार्मर याने यशस्वी जयस्वाल अन् त्यापाठोपाठ साई सुदर्शनला बाद केलं. त्यामुळे टीम इंडिया लगेच कोलमडल्याचं पहायला मिळालं.
advertisement
साई सुदर्शन अन् जयस्वाल आऊट
यशस्वी जयस्वाल 97 बॉलमध्ये 58 धावा करून आऊट झाला तर साई सुदर्शन हा 40 बॉलमध्ये 15 धावा करून आऊट झालाय. सायमन हार्मर याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज याला देखील केएल राहुलची मोठी विकेट मिळाली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ
दरम्यान, आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामीने जबरदस्त संयम दाखवत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आणि 107 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला मार्को जान्सेनने आक्रमक साथ दिली. जान्सेनने भारतीय गोलंदाजीची पिसं काढत 93 धावा कुटल्या, ज्यामध्ये तब्बल 7 सिक्स समाविष्ट होते. या जोडीने आणि तळाच्या फलंदाजांनी मिळून शेवटच्या चार विकेट्ससाठी 243 धावा जोडल्या, ज्यामुळे या मॅचचे चित्रच पालटले. भारताच्या गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादवने 4 विकेट्स घेतल्या, पण इतर फिरकी गोलंदाजांची जादू चालली नाही. जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स मिळवल्या, मात्र दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले आहेत.
