ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पहिली तुकडी रवाना
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पहिली तुकडी रवाना झाली आहे. यामध्ये विराट कोहली, उपकर्णधार श्रेयस अय्यर, माजी कॅप्टन रोहित शर्मा, कॅप्टन शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरैल आणि हर्षित राणा रवाना झाले आहेत. यावेळी गौतम गंभीर मात्र टीम इंडियाच्या पहिल्या तुकडीसोबत दिसला नाही. मात्र, हर्षित राणा पहिल्या तुकडीसोबत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
गंभीरचा लाडका खेळाडू रवाना
एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर असताना गंभीरने हर्षित राणाच्या रुपात आपला माणूस पाठवल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हर्षित राणा हा गंभीरचा लाडका खेळाडू मानला जातो. हर्षित राणा हा गंभीरच्या पार्टीमध्ये देखील उपस्थित होता. तर हर्षित राणा याच्या सिलेक्शनवरून देखील अनेक प्रश्न विचारले जात होते. अशातच आता इतर खेळाडू देखील आज रात्री रवाना होतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
वनडे सामन्यांचं वेळापत्रक (IND vs AUS ODI Schedule)
19 ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ.
23 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड.
25 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी.
कोणते खेळाडू अजूनही भारतात?
दरम्यान, गौतम गंभीरसह अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी आणि कुलदीप यादव या खेळाडूंनी अजून ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी केली नाहीये. त्यामुळे आता दिल्ली विमानतळावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.