आयसीसीचा नियम काय?
आयसीसीच्या नियमांनुसार, विजेतेपदाचे पदक 15 सदस्यांच्या संघालाच दिलं जातं. प्रतिका सुरुवातीला संघाचा भाग असली तरी, दुखापतीनंतर शफालीचा संघात समावेश करण्यात आला. सेमीफायनलपूर्वी प्रतिका वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. फायनलमध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या शफालीस पदक मिळालं, पण प्रतिकाला नाही.
घोट्याच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2025 मधून बाहेर
advertisement
तुम्हाला माहिती असेल तर, 2003 च्या मेन्स वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीसोबतही अशीच घटना घडली होती. त्याने 4 सामने खेळले आणि 8 विकेट्स घेतल्या, पण दुखापतीमुळे तो नॅथन ब्रॅकनने बदलला गेला आणि त्यालाही पदक मिळालं नाही. घोट्याच्या दुखापतीमुळे आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मधून बाहेर झालेली प्रतिका रावळ, रविवारी रात्री फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 52 रनने विजय मिळवून आपल्या टीमला ट्रॉफी उचलताना पाहून भावना आवरू शकली नाही. व्हीलचेअरवर बसून सेलिब्रेट केलं.
प्रतिका रावल म्हणाली....
"मला ते व्यक्तही करता येत नाहीये. माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या खांद्यावर असलेला हा झेंडा खूप महत्त्वाचा आहे. माझ्या टीमसोबत इथे असणं अविश्वसनीय आहे. दुखापती खेळाचा भाग आहेत, पण मला आनंद आहे की मी या टीमचा अजूनही भाग आहे. मला ही टीम खूप आवडते. माझ्या भावना मला व्यक्त करता येत नाहीयेत - आम्ही खरंच ते करून दाखवलं! इतक्या वर्षांत वर्ल्ड कप जिंकणारी आम्ही पहिली भारतीय टीम आहोत. संपूर्ण भारताला याचा हक्क आहे. खरं सांगायचं तर, खेळण्यापेक्षा मॅच पाहणे अधिक कठीण होते. प्रत्येक विकेट, प्रत्येक फोर - यामुळे अंगावर काटा येत होता. ऊर्जा, गर्दी, भावना - ते अविश्वसनीय होतं", असं प्रतिका रावल म्हणाली होती.
