TRENDING:

IPL 2024 : धोनी IPL 2024 चा पूर्ण सिझन खेळणार की नाही? CSK च्या कोचने दिली महत्वाची माहिती

Last Updated:

चेन्नईने कर्णधार बदलल्यानंतर धोनी यंदा आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर आता चेन्नई सुपरकिंग्सचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने भाष्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपरकिंग्सने कर्णधार बदलण्याविषयी मोठी घोषणा केली. एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नईच्या या निर्णयानंतर धोनी यंदा आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर आता चेन्नई सुपरकिंग्सचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने भाष्य केलं आहे.
धोनी IPL 2024 चा पूर्ण सिझन खेळणार की नाही? CSK च्या कोचने दिली महत्वाची माहिती
धोनी IPL 2024 चा पूर्ण सिझन खेळणार की नाही? CSK च्या कोचने दिली महत्वाची माहिती
advertisement

चेन्नई सुपरकिंग्सचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने सांगितले की, "आम्ही 2022 मध्ये एम एस धोनीने कर्णधारपद सोडावे यासाठी तयार नव्हतो. धोनीला क्रिकेटची चांगली माहिती आहे आणि आम्ही युवा खेळाडूंना या भूमिकेसाठी तयार करू इच्छित होतो. यावेळी आम्ही तयार आहोत. मागील वेळी जेव्हा धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्व स्तब्ध झालो होतो कारण आम्ही यासाठी तयारच नव्हतो. परंतु यावेळी आम्हाला माहित होते".

advertisement

IPL 2024 : धोनीने का सोडलं कर्णधारपद? जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडलाच का दिली संधी?

कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाला, "आम्ही नवीन कर्णधार तयार करण्यासाठी मेहनत घेत होतो. युवा खेळाडूंवर विश्वास दाखवल्याचा आम्हाला नेहमीच फायदा मिळालेला आहे. मी ऋतुराज सोबत नेतृत्व करण्याबाबत बोललो आहे. त्याच्याकरता ही एक उत्तम संधी आहे". स्टीफन फ्लेमिंग पुढे धोनी विषयी बोलताना म्हणाला, "आयपीएलपूर्वी झालेल्या सराव सामन्यात धोनी फिट दिसत आहे. यावेळी त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही अडचण नाही. त्याने सराव सामन्यात खेळाचे चांगले प्रदर्शन केले आहे त्यामुळे मला आशा आहे की तो संपूर्ण सिझन खेळू शकेल'.

advertisement

धोनीने चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आयपीएल 2024 हा धोनीचा शेवटचा आयपीएल सिझन असेल अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी एम एस धोनी संपूर्ण सिझन फिट नव्हता, आयपीएल संपल्यावर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर यंदाच्या आयपीएलसाठी त्याने आपल्या फिटनेसवर खूप काम केले आहे. धोनी जुलै 2024 मध्ये 43 वर्षांचा होईल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : धोनी IPL 2024 चा पूर्ण सिझन खेळणार की नाही? CSK च्या कोचने दिली महत्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल