TRENDING:

IPL 2024 : मुंबई-गुजरात-मुंबई; हार्दिक पंड्याच्या 'रिटर्न जर्नी' ची ही महत्त्वाची कारणं

Last Updated:

हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. मुंबई इंडियन्सने याची अधिकृत घोषणा केलीय. दोन वर्षे गुजरात टायटन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 27 नोव्हेंबर : IPL 2024 साठी हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. मुंबई इंडियन्सने याची अधिकृत घोषणा केलीय. दोन वर्षे गुजरात टायटन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक पंड्या पुन्हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. मात्र मुंबईतून बाहेर पडल्यावर गुजरात टायटन्स टीमचा कॅप्टन बनलेला, याच गुजरातला टीमला आयपीएल जिंकून देणारा आणि दोन्ही वेळा फायनलमध्ये पोहोचवणारा हार्दिक पंड्या पुन्हा मुंबईत का परततोय? गुजरात टायटन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये नेमकं काय झालं? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.
गुजरात सोडून मुंबईकडे का आला हार्दिक पंड्या?
गुजरात सोडून मुंबईकडे का आला हार्दिक पंड्या?
advertisement

2015 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये बडोद्याकडून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याचं नाव पुकारण्यात आलं. तेव्हा अवघ्या २२ वर्षांच्या या ऑलराऊंडर प्लेयरसाठी बोली लावणारी मुंबई इंडियन्स ही एक मात्र टीम होती. यावेळी फक्त 10 लाखात हार्दिक पंड्या मुंबई टीममध्ये आला त्यानंतर तडाखेबंद बॅटिंग आणि तितक्याच धारदार बॉलिंगमुळे तो मुंबईचा स्टार खेळाडू बनला. परंतु 2021 चा आयपीएल सीझन हार्दिकसाठी खराब ठरला त्यामुळे त्याच वर्षी मेगा ऑक्शनआधी प्लेयर्स रिटेन करायची वेळ आली तेव्हा मुंबईनं रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव या चौघांना रिटेन केलं आणि हार्दिक आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मुंबई पलटनच्या बाहेर पडला.

advertisement

2022 मध्ये आयपीएल स्पर्धेत दोन नव्या टीम आयपीएलमध्ये सामील झाल्या. यावेळी मूळचा गुजरातचा असल्यानं गुजरात टायटन्सनं हार्दिकवर विश्वास दाखवला आणि हार्दिक पंड्याकडे टीमचे कॅप्टनपद सोपवले. गुजरात टायटन्सने हार्दिकच्या नेतृत्वात 2022 चं आयपीएल टायटलही जिंकले तर 2023 च्या स्पर्धेत देखील टीम फायनलपर्यंत पोहोचली. सलग दोन आयपीएलमधल्या तगड्या परफॉर्मन्समुळे हार्दिक पंड्यासह गुजरात टायटन्सचा दबदबा वाढला.

advertisement

IPL 2024 : लिलावात अनसोल्ड राहू शकतात 5 मोठे खेळाडू, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधारही यादीत

गुजरात टायटन्सचा कॅप्टनम्हणून एवढं यश मिळालं असताना हार्दिकनं मुंबईत येण्याचं कारण काय? असा प्रश्न पडतो. तर आतली माहिती अशी आहे की पुढच्या सीझनसाठी हार्दिकनं गुजरात टायटन्सचे मालक असलेल्या सीव्हीसी कॅपिटल्सकडे करारापोटी जास्त पैसे आणि ब्रँड एन्डॉर्समेंटची मागणी केली. पण त्यांनी हार्दिकची ही मागणी फेटाळून लावली. हे सगळं घडलं साधारण जुलै-ऑगस्टमध्ये. आणि त्यानंतर हार्दिकनं मुंबई इंडियन्सशी कॉन्टॅक्ट केला. हार्दिकची ही मागणी मुंबई इंडियन्सनं लगेचच मान्य केली. त्यामुळे आता मुंबईच्या टीमने हार्दिकला 15 कोटींच्या बदल्यात ट्रेड करुन त्याला आपल्या ताफ्यात घेतलंय.

advertisement

पोलार्ड गेल्यापासून मुंबईच्या टीममध्ये एक पोकळी तयार झाली होती. आता हार्दिक पंड्याच्या रुपात ती भरुन निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा हा टीम इंडियाचा देखील कॅप्टन असल्याने त्याच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून देखील हार्दिक पंड्याची वर्णी लागू शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : मुंबई-गुजरात-मुंबई; हार्दिक पंड्याच्या 'रिटर्न जर्नी' ची ही महत्त्वाची कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल