IPL 2024 : लिलावात अनसोल्ड राहू शकतात 5 मोठे खेळाडू, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधारही यादीत

Last Updated:

रिटेन खेळाडूंची यादी जारी केली असली तरी ऑक्शनपूर्वी अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं. तसंच हे खेळाडू लिलावात अनसोल्ड राहु शकतात.

IPL
IPL
मुंबई, 27 नोव्हेंबर : आयपीएल २०२४ साठी लिलावाचे आयोजन १९ डिसेंबरला केला जाणार आहे. यंदाच्या आयपीएल लिलावाचे यजमानपद दुबईत असेल. दरम्यान, आयपीएल लिलावाआधी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. यासाठी अखेरची तारीख २६ नोव्हेंबर होती. दरम्यान, रिटेन खेळाडूंची यादी जारी केली असली तरी ऑक्शनपूर्वी अनेक बड्या खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं. तसंच हे खेळाडू लिलावात अनसोल्ड राहु शकतात.
जो रूट - इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा राजस्थान रॉयल्स संघात खेळतो. राजस्थान जो रूटला रिलीज करू शकते. जो रूट ऑक्शनमध्ये असेल तर कोणताही संघ त्याला घेण्यासाठी उत्सुक असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तो अनसोल्ड राहू शकतो
सरफराज खान - युवा क्रिकेटर सरफराज खानला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं आहे. सरफराज खान लिलावात असेल. पण त्याला घेण्यासाठी कोणता संघ रस दाखवतो हे पाहावं लागेल. जर त्याला कोणत्याही संघाने घेतलं नाही तर तो अनसोल्ड राहील.
advertisement
दसुन शनाका - श्रीलंकेचा दसुन शनाका गुजरात टायटन्समध्ये आहे. दसुन शनाकाला गुजरात टायटन्स रिलीज करेल असं म्हटलं जातंय. त्यामुळे त्यालाही कोणता संघ घेणार नाही अशी चर्चा आहे.
शाकिब अल हसन - बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला दुखापत झाली होती. आता केकेआर शाकिब अल हसनला रिलीज करू शकते. शाकिब अल हसनची अलिकडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही त्यामुळे त्याला घेण्यासाठी इतर संघ उत्सुक असण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
ख्रिस जॉर्डन - गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर ख्रिस जॉर्डनला रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. मात्र आता ख्रिस जॉर्डनला रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. जर त्याला रिलीज केलं गेलं तर दुसरा संघ उत्सुक नसल्यास जॉर्डन अनसोल्ड राहू शकतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : लिलावात अनसोल्ड राहू शकतात 5 मोठे खेळाडू, वर्ल्ड चॅम्पियन कर्णधारही यादीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement