चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 114 धावांचं सोपं आव्हान मिळालं होत. कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान 8 विकेट्स आणि तब्बल 10 ओव्हर्स राखून पूर्ण केलं. ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला.
advertisement
T20 World Cup : अमेरिकेत कसे होणार भारताचे सामने? कधी, कुणासोबत भिडणार, खास HD वेळापत्रक Photos
संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी करून अनेक मोठे विक्रम रचणारी सनरायजर्स हैदराबादची टीम मात्र फायनल सामन्यात फ्लॉप ठरली. त्यांचा कोणताही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांना देखील विकेट्स काढण्यात यश आले नाही, आणि परिणामी त्यांचा पराभव झाला. हा पराभव हैदराबादच्या टीमची मालकीण काव्या मारन हिच्या जिव्हारी लागला. स्टॅन्डमध्ये बसलेल्या काव्याला अश्रू अनावर झाले. तिचे हे अश्रू कॅमेऱ्याने टिपले. मात्र त्यानंतर अश्रू पुसत तिने विजयी झालेल्या केकेआरच्या संघासाठी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले.
सामना संपल्यावर पॅट कमिन्स आणि डेनियल वेटोरी सोबत बोलल्यावर काव्या मारन हैदराबादच्या ड्रेसींग रूममध्ये पोहोचली. यावेळी सर्व खेळाडू उदास होते. तेव्हा काव्या मारन म्हणाली, "तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप गौरवांकित केलं आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की तुम्ही टी 20 खेळ कसा खेळावा याला रिडिफाइन केलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही संपूर्ण सिझन खेळला आहात त्यामुळे आज प्रत्येक जण तुमच्या बद्दल बोलत आहेत. आज आपला खराब दिवस होता परंतु तुम्ही सर्व खूप छान खेळलात. गेल्यावर्षी आपण पॉईंट टेबलमध्ये खूप खाली होती. पण तुम्ही या सीझनमध्ये जस परफॉर्म केलंत त्यामुळे फॅन्स मोठ्या संख्येने तुमचा खेळ बघायला येत होते. आज केकेआरने ही स्पर्धा जिंकली असली तरी लोक नक्कीच तुमच्या खेळाबद्दल चर्चा करत असणार.