कॅप्टन बदलला अन् मॅच फिरली
दिल्लीसाठी फलंदाजी करत असलेला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे अचानक दुखापतग्रस्त (Ajinkya Rahane Injury Update) झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्यामुळे उर्वरित सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फिरकीपटू सुनील नरेनला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची भूमिका घ्यावी लागली. सुनील नरेन कॅप्टन म्हणून मैदानात आला अन् त्याने फिरकीच्या जोरावर दिल्लीचा किल्ला उद्वस्त केला. दिल्लीला पुढच्या 7 ओव्हरमध्ये स्पिनर्सच्या आक्रमणामुळे काहीही हालचाल करु दिली नाही अन् नरेनने सामना जिंकवला.
advertisement
केकेआरचं काय चुकतंय?
सुनील नरेनच्या अफलातून कॅप्टन्सीमुळे आता अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर समालोचकांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रेयस अय्यरनंतर केकेआरने सुनील नरेनचा विचार करायला हवा होता का? असा सवाल आकाश चोप्राने (Akash chopra On KKR captaincy) लाईव्ह कॉमेन्ट्री करताना विचारला होता. तसेच आता कोलकातापासून ते सोशल मीडियापर्यंत केकेआरच्या कॅप्टन्सीवर चर्चा होताना दिसत आहे.
केकेआरचं वरुणास्त्र
दरम्यान, केकेआरच्या गोलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये भेदक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवले. आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना या दबावाचा सामना करता आला नाही आणि नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या.