कोलकात्याची बॅटिंग मोसमाच्या पहिल्याच सामन्यापासून संघर्ष करत आहे. आयपीएलच्या या मोसमासाठी केकेआरने रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, हर्षीत राणा आणि रमणदीप सिंग यांना रिटेन केलं, तर लिलावामध्ये व्यंकटेश अय्यरवर तब्बल 23.75 कोटी रुपये खर्च केले. व्यंकटेश अय्यरवर एवढा खर्च करूनही केकेआरला त्याच्याकडून किंमतीला साजेसा परतावा मिळालेला नाही. व्यंकटेश अय्यरने या मोसमामध्ये बॉलिंगही केली नाही, सोबतच त्याने बॅटिंगमध्येही संघर्ष केला आहे.
advertisement
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात व्यंकटेश अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. 5 बॉलमध्ये 7 रन करून व्यंकटेश अय्यर आऊट झाला. आयपीएल 2025 च्या 10 सामन्यांमध्ये व्यंकटेश अय्यरने 20.29 ची सरासरी आणि 139.22 च्या सरासरीने फक्त 142 रन केले आहेत, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 60 रन ही व्यंकटेश अय्यरची यंदाच्या मोसमातली सर्वोत्तम खेळी आहे.
2021 पासून व्यंकटेश अय्यर केकेआरच्या टीमचा भाग आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात अय्यरने धमाकेदार कामगिरी केली होती, ज्यामुळे केकेआरला तिसरी ट्रॉफी जिंकायला मदत झाली होती. आयपीएलमधल्या याच कामगिरीमुळे शाहरुख खानच्या केकेआरने व्यंकटेश अय्यरला लिलावामध्ये मोठी किंमत देऊन विकत घेतलं.
व्यंकटेश अय्यरचं आयपीएल रेकॉर्ड
व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत 61 आयपीएल सामन्यांमध्ये 137.32 चा स्ट्राईक रेट आणि 29.96 च्या सरासरीने 1468 रन केले आहेत, ज्यात एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.