खरं तर मुंबईच्या पर्समध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच 2.75 कोटी रूपये उरले होते.त्यात मुंबईला पाच खेळाडूंची खरेदी करायची होती. त्यात एक खेळाडू हा परदेशी होता.त्यामुळे लिलाव सुरू व्हायच्या तासाभरातच आता मुंबई इंडियन्सने त्याच्या जून्या भिडूला ताफ्यात घेतले आहे. हा जूना भिडू म्हणजे क्विंटन डिकॉक आहे. क्विंटक डिकॉक याआधी मुंबई इंडियन्समधून आयपीएल खेळला आहे.विशेष म्हणजे त्याने 2020 च्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली होती. त्यामुळे आपला जूनाच खेळाडू ताफ्यात आल्याने मुंबईची ताकद वाढली आहे.
advertisement
दरम्यान क्विंटन डिकॉकची बेस प्राईज 1 कोटी रूपये होती. याच बेस प्राईजच्या किंमतीत मुंबईने त्याला ताफ्यात घेतलं आहे. दरम्यान आता मुंबईच्या पर्समध्ये फक्त 1.75 कोटी रूपये उरले आहेत. यामध्ये त्यांना 4 खेळाडू खरेदी करावे लागणार आहे. पण त्यांना कोणताच परदेशी खेळाडू घेता येणार नाही आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ :
अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे (टी), मिचेल सँटनर, नमन धीर, रघु शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा,रायन रिकेल्टन, शार्दुल ठकुर, शार्दुल ठक्कर (सूर) यादव, टिळक वर्मा,ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स
