सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कमिन्सच्या या निर्णयाचा फटका सनरायजर्स हैदराबादला बसला. चेपॉकमध्ये एक दिवस आधी पाऊस झाला होता. त्यामुळे केकेआरच्या वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्विंग होत होते. केकेआरच्या वेगवान माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी गडगडली. त्यांचा संघ फक्त ११३ धावाच करू शकला.
IPL 2024 : KKR जिंकलं, SRHचं स्वप्न भंगलं; तर विराटने नोंदवला खास विक्रम
advertisement
सनरायजर्स हैदराबादला अंतिम सामन्यात त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी धोका दिला. आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणाऱ्या जोडीला फायनलमध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. ट्रॅव्हिस हेड शून्यावर तर अभिषेक शर्मा फक्त दोन धावा करून बाद झाला. इथंच सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का बसला.
मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयशसुद्धा हैदराबादच्या पराभवाला कारणीभूत ठरले. केकेआरने नव्या चेंडूवर आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडल्यानंतर मधल्या फळीतही कोणी टिकाव धरू शकले नाही. पॅट कमिन्स २४ धावाच करू शकला. यामुळे हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.
हैदराबादच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर गोलंदाजांनीही मोठी निराशा केली. पॅट कमिन्सने सुरुवातीला विकेट घेत आशा निर्माण केल्या होत्या. पण त्यानंतर हैदराबादला केकेआरचे फलंदाज बाद करता आले नाहीत. पॅट कमिन्सशिवाय शहबाज अहमदने एक विकेट घेतली.
आयपीएलच्या १७ व्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची सर्वात मोठी ताकद फलंदाजी होती. पण फायनलमध्ये पॅट कमिन्सची मोठी चूक झाली. त्याला खेळपट्टीचा अंदाज आला नाही आणि संघाला फक्त ११३ धावाच करता आल्या. या सामन्यात केकेआरने एकतर्फी विजय मिळवून तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.