IPL 2024 : KKR जिंकलं, SRHचं स्वप्न भंगलं; तर विराटने नोंदवला खास विक्रम

Last Updated:

आयपीएलचं विजेतेपद केकेआरने पटकावलं, तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

News18
News18
चेन्नई : यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआरने अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर दणदणित विजय मिळवतं तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायजर्सची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त २१ धावात तंबूत परतले होते. पॉवर प्लेमध्ये सर्वोच्च धावा काढण्याचा विक्रम नावावर असलेली जोडी महत्त्वाच्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. हैदराबादचा डाव फक्त ११३ धावात आटोपला. त्यानंतर केकेआरने फक्त दोन गड्यांच्या मोबदल्यात ११ षटकातच सामना खिशात घातला.
आयपीएलचं विजेतेपद केकेआरने पटकावलं, तर सनरायजर्स हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या दोन्ही संघातील खेळाडूंना जी कमाल करता आली नाही ती आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने केलीय. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने सर्वाधिक धावा काढल्या, यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. या शर्यतीत सनरायजर्स हैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हेसुद्धा होते. मात्र गेल्या काही सामन्यात दोघांचीही कामगिरी निराशाजनक अशी राहिली. हेडने ५६७ तर अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात ४८२ धावा केल्या.
advertisement
गेल, वॉर्नरनंतर तिसरा असा फलंदाज
विराट कोहलीनंतर यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १४ सामन्यात एका शतकासह ५८३ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावलीय. विराटच्या आधी ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनाच अशी कमाल करता आलीय. गेलने २०११ आणि २०१२ मध्ये ऑरेंज कॅप पटकावली होती. तर डेव्हिड वॉर्नरने २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये तीनवेळा एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केलीय.
advertisement
दोनवेळा ऑरेंज कॅप पटकावणारा पहिला भारतीय
विराट कोहलीने २०१६ मध्ये १६ सामन्यात ९७३ धावा केल्या होत्या. त्यात विराटने ४ शतके आणि ७ अर्धशतके केली होती. विराटच्या नावावर एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही कायम आहे. तसंच दोन वेळा ऑरेंज कॅप पटकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : KKR जिंकलं, SRHचं स्वप्न भंगलं; तर विराटने नोंदवला खास विक्रम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement