KKR VS SRH : 'आजारी आईला सोडून आलो.. फायनलपूर्वी म्हणाली बेटा, ट्रॉफी जिंकून ये'; KKR चा खेळाडू भावुक

Last Updated:

KKR VS SRH : गोलंदाजांच्या वादळापुढे पॅट कमिन्सचा संघ केवळ 113 धावांतच संपुष्टात आला. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर त्यांनी 10.3 षटकांत सामना जिंकून तिसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला.

News18
News18
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात एकतर्फी अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव केला. गोलंदाजांच्या वादळापुढे पॅट कमिन्सचा संपूर्ण संघ श्रेयस अय्यरने केवळ 113 धावांत गारद केला. यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर त्यांनी अवघ्या 11 षटकांत सामना जिंकून तिसऱ्यांदा ट्रॉफीवर कब्जा केला. KKR संघाचा एक खेळाडू फायनल खेळण्यापूर्वी आईला रुग्णालयात सोडून भारतात आला होता.
आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव केला. अवघ्या 11 षटकांत लक्ष्य पूर्ण करत 8 गडी राखून ट्रॉफीवर कब्जा केला. नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने कोलकाताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीने हैदराबादला सुरुवातीलाच बॅकफूटवर आणले. लागोपाठ दोन विकेट गमावल्याने संघ दडपणाखाली गेला. तो पुन्हा सावरलाच नाही. संपूर्ण संघ 113 धावांवर गडगडला आणि व्यंकटेश अय्यरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने अवघ्या 10.3 षटकांत विजयाची नोंद केली.
advertisement
आजारी आईला सोडून भारतात
क्वालिफायरमध्ये हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कोलकाताचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने सांगितले होते की, तो त्याच्या आजारी आईला अफगाणिस्तानात सोडून आला होता. आयपीएल फायनलमध्ये गुरबाजने 39 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. सामन्यानंतर त्याने सांगितले की, तो सामन्यापूर्वी त्याच्या आईशी बोलत होता. तो म्हणाला, माझ्या आईची तब्येत आता ठीक आहे. ती हा सामना पाहत होती. मी सामन्यापूर्वी तिच्याशी बोललो आणि विचारले, मी तुझ्यासाठी काय आणू? माझ्यासाठी फक्त ट्रॉफी जिंकणे पुरेसे आहे, असं आईचं उत्तर होतं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR VS SRH : 'आजारी आईला सोडून आलो.. फायनलपूर्वी म्हणाली बेटा, ट्रॉफी जिंकून ये'; KKR चा खेळाडू भावुक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement